रस्त्यावर फिरण्यावरून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST2021-04-04T04:18:01+5:302021-04-04T04:18:01+5:30
परभणी शहरातील आरोग्य काॅलनी भागातील निखिल बालासाहेब कराड हा तरुण २९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास पवनसुत नगर ...

रस्त्यावर फिरण्यावरून एकास मारहाण
परभणी शहरातील आरोग्य काॅलनी भागातील निखिल बालासाहेब कराड हा तरुण २९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास पवनसुत नगर ते आरोग्य काॅलनी या रस्त्याने जात असताना खदानी परिसरातील एका घराजवळ किरण पांचाळ व गणेश पांचाळ हे दोघे आले. त्यांनी निखिल कराड याच्यासोबत वाद घातला. तसेच या कॉलनीतील रस्त्यावरून वारंवार का फिरतो, म्हणून लाकडी फळीने मारहाण केली. यावेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. गंभीर मार लागल्याने निखिल यास उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्याने पोलिसांना जबाब दिला. त्यावरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपी किरण पांचाळ व गणेश पांचाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.