One died on the spot in accident of a two bikes | दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू 

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू 

ठळक मुद्देएक जण गंभीर जखमी

ताडबोरगाव (जि. परभणी ) : दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एकाचा जागीच मृत्यू होऊन एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर ताडबोरगावजवळ शुक्रवारी ( दि. ३१ ) दुपारी २ वाजेच्या सुमारास झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, ताडबोरगावजवळ परभणीहून पाथरीकडे जाणारी एक दुचाकीची ( एमएच २६ वाय १८२ ) व पाथरीवरून परभणीकडे जाणाऱ्या दुचाकीसोबत ( एमएच २२ एएस ७२७९ ) समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील संदीप कन्हैयाला चंदन ( २४, रा. महावीर चौक,अंबड) याचा जागीच मृत्यू झाला.  तर परवेझ पठाण ( रा. पाथरी ) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, कोल्हा ते परभणी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांनी चाळणी झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वीस दिवसांपूर्वी याच जागेवर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

Web Title: One died on the spot in accident of a two bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.