पूर्णाजवळ धावत्या रेल्वेतून पडून वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:56 IST2019-01-29T13:55:28+5:302019-01-29T13:56:30+5:30
मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पूर्णाजवळ धावत्या रेल्वेतून पडून वृद्धाचा मृत्यू
पूर्णा (परभणी) : पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील गौर शिवारात धावत्या रेल्वेतून पडून एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान गौर ते गोविंदपूर दरम्यान लोहमार्गाजवळ एका 65 वर्षीय इसमाचा मृतदेह कामावरील गँगमन यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी याची माहिती चुडावा पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोना पंडित पवार, लिंगीराम पोकलवर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. मृतदेहाची स्थिती पाहून वृद्ध धावत्या रेल्वेतून पडून मृत पावल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला. मृताच्या अद्याप ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.