शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 13:49 IST

OBC Reservation: भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला.

परभणी : ओबीसी समाजाचे रद्द केलेले आरक्षण तत्काळ देण्यात यावे तसेच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौक येथे २६ जून रोजी सकाळी १०.३० ते ११.१५ दरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांना नानलपेठ पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले व काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण तत्काळ देण्यात यावे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. सुमारे पाऊन तास हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, एन.डी.देशमूख, सुनिल देशमुख, दिनेश नरवाडकर, विजय दराडे, संजय कुलकर्णी, रामदास पवार, मोहन कुलकर्णी, अनंता गिरी, संतोष जाधव, मुकीम खिल्लारे, रितेश जैन, सुप्रिया कुलकर्णी, गीता सूर्यवंशी, ऐश्वर्या कांबळे, विजय गायकवाड, गणेश जाधव, संजय जोशी, गणेश देशमुख, संजय शेळके, रोहित जगदाळे, समीर दुधगावकर, मिरज बुचाले, प्रिया पेदापल्ली, सारिका धुमाळ, विजया कातकडे, शंकुतला मठपती, डाँ. पुष्पा मुंडे, प्रिया कुलकर्णी, पूनम शर्मा यांच्यासह जवळपास १०० पदाधिकाऱ्यांचा चक्काजाम आंदोलनात सहभाग होता. 

या आंदोलनाला वंजारी सेवा संघ असोसिएशन, राष्ट्रीय नाभिक संघ व ब्राम्हण महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी नानलपेठ तसेच कोतवाली पोलिस स्टेशन आणि दंगा नियंत्रण पथकाने तगडा बंदोबस्त आंदोलनस्थळी ठेवला होता.  चक्काजाम आंदोलनामुळे जिंतूर महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या. पोलिस ठाण्यात सर्व आंदोलकांना हजर करण्यात आले, त्यानंतर काही वेळाने आंदोलकांची सुटका करण्यात आली.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणparabhaniपरभणी