जिंतूरमध्ये वन विभागाच्या रोपवाटिकेस मजुरांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 16:46 IST2018-07-12T16:44:59+5:302018-07-12T16:46:15+5:30

जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील वन विभागाच्या रोप वाटीकेला येथील मजुरांनी मजुरी थकल्याने आज सकाळी टाळे ठोकले.

Nursery locked by the laborers of forest department in Jantoor | जिंतूरमध्ये वन विभागाच्या रोपवाटिकेस मजुरांनी ठोकले कुलूप

जिंतूरमध्ये वन विभागाच्या रोपवाटिकेस मजुरांनी ठोकले कुलूप

परभणी :  जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील वन विभागाच्या रोप वाटीकेला येथील मजुरांनी मजुरी थकल्याने आज सकाळी टाळे ठोकले. या मजुरांची मजुरी मागील १२ महिन्यांपासून थकीत आहे. 

सावंगी म्हाळसा येथे वन विभागाची रोपवाटिका आहे.  या रोपवाटिकेत काम करत असलेल्या मजुरांना मागील वर्षभरापासून मजुरी मिळालेली नाही. ही थकीत रक्कम देण्यात यावी अशी मागणी मजुरांनी वारंवार केली. मात्र, वनविभागाने या कडे दुर्लक्ष केले. यामुळे आज दुपारी थकीत मजुरीची मागणी करत मजुरांनी रोपवाटीकेस कुलूप ठोकत काम बंद आंदोलन केले. आंदोलनात शिवराज देवळे, मीरा देवळे, मीरा कुकडे, गंगाबाई शिरसोदे, आश्रोबा शिरसोदे, राजाबाई होडबे, प्रवीण कुकडे, दयानंद पितळे, सायनाबाई वाकळे, मधुकर शिरसोदे आदींचा सहभाग आहे. 

Web Title: Nursery locked by the laborers of forest department in Jantoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.