आता एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST2021-03-23T04:18:17+5:302021-03-23T04:18:17+5:30
केंद्र शासनाने ‘वन नेशन वन राशन’ या उपक्रमांतर्गत चालू महिन्यात रेशन धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी ‘मेरा रेशन’ ...

आता एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डची माहिती
केंद्र शासनाने ‘वन नेशन वन राशन’ या उपक्रमांतर्गत चालू महिन्यात रेशन धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी ‘मेरा रेशन’ हे ॲप सुरु केले आहे. विविध १४ भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे रेशन कार्डधारकांना जवळचे दुकान तातडीने सापडेल. तसेच आपल्या रेशन कार्डवर किती आणि केंव्हा धान्य वितरीत करण्यात आली आहे? याचे एकूण मुल्य किती आहे? ? यासंदर्भातील माहिती कार्डधारकांना मिळणार आहे. त्यामुळे रेशन धान्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींना आळा बसणार आहे.
क्लीकवर मिळणार ही माहिती
लाभार्थ्यांना मिळणारे धान्य, जवळपास असलेले रास्त भाव दुकान, शिधापत्रिकेवर उचलेल्या धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र की अपात्र? याबाबतची माहिती एका क्लीकवर रेशन कार्डधारकांना मिळणार आहे. त्यामुळे यासंदर्भतील कामात पारदर्शकता येणार आहे. वन नेशन वन राशन’ या उपक्रमांतर्गत रेशन कार्डधारकांकडून रेशन कार्डची पोर्टेबिलीटी केली जात आहे.
तक्रार ॲपवर नोंदवा...
एखाद्या रेशन दुकानदाराने कमी धान्य दिले असेल किंवा शासनाने निश्चत केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम घेतली गेली असेल तर या ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.
ही सर्व प्रणाली ऑनलाईन असल्याने या तक्रारी निश्चीत वेळेत निकाली काढणे बंधनकार राहणार आहे.
रेशन कार्डबाबतची सर्व माहिती ऑनलाईन
रेशन कार्डबाबतची सर्व माहिती आधार इनेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टमच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यानुसार रेशन कार्डधारकांना आधार बेस बायोमेट्रीक अधिप्रमाणद्वारे धान्य वितरीत करण्यात येत आहे.