परभणीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:11 IST2019-02-14T00:11:03+5:302019-02-14T00:11:30+5:30

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्या, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ‘जॉब दो’ हे आंदोलन करण्यात आले.

NCP's Youth Congress Front in Parbhani | परभणीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा मोर्चा

परभणीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्या, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ‘जॉब दो’ हे आंदोलन करण्यात आले.
मोठा गावा-वाजा करुन मोदी सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया, दीन दयाल ग्रामीण कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना या योजना फेल ठरल्या आहेत. केवळ आश्वासन न देता बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने बुधवारी गव्हाणे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. वक्त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. या मोर्चामध्ये माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, मारोतराव बनसोडे, मा.खा. सुरेश जाधव, किरण सोनटक्के, विठ्ठल सूर्यवंशी, नंदा राठोड, सिद्धांत हाके, किरण तळेकर, इम्रान हुसेनी, जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: NCP's Youth Congress Front in Parbhani