खळबळजनक ! खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 15:50 IST2021-03-05T15:49:17+5:302021-03-05T15:50:06+5:30

पोलिसांचे मृत महिलेची ओळख पटविण्याचे पर्यंत सुरु आहेत. 

The murdered woman's body was tied in a sack and thrown into a canal | खळबळजनक ! खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला

खळबळजनक ! खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला

सेलू :तालुक्यातील निपाणी टाकळी शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार या २५ वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला असावा. पोलिसांचे मृत महिलेची ओळख पटविण्याचे पर्यंत सुरु आहेत. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या प्राथमीक माहितीनूसार,  निपाणी टाकळी शिवारात मुक्तार खा पठाण यांचे शेत ( सर्वे क्रमांक 103 ) आहे. येथील कालव्यात हिरव्या रंगाच्या कापडी पोत्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थांना आढळून आला. त्यांनी पोलिसांना यांची माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, पोलिस निरिक्षक गोवर्धन भूमे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सरला गाडेकर, पोलिस उपनिरीक्षक माधव लोकूलवार, पोलिस कर्मचारी सुधाकर चौरे, रामेश्वर मुंढे, बाळू पुरणवाड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. प्राथमिक अंदाजानुसार या २५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात फेकला असावा. तसेच गूरूवारी रात्री दुचाकीवरून मृतदेह आणून कालव्यात फेकला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

Web Title: The murdered woman's body was tied in a sack and thrown into a canal