पैशांच्या वादातून युवकाचा रॉडने मारहाण करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:29 IST2020-07-10T17:29:01+5:302020-07-10T17:29:39+5:30

गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास काद्राबाद प्लॉट परिसरात मारहाण

Murder by beating a youth with a rod over a money dispute | पैशांच्या वादातून युवकाचा रॉडने मारहाण करून खून

पैशांच्या वादातून युवकाचा रॉडने मारहाण करून खून

परभणी : उसने दिलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावत असल्याने एका युवकावर रॉडचे वार करून त्याचा खून केल्याची घटना परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरात ९ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

येथील काद्राबाद प्लॉट भागातील जमीर खान युनूस खान (२९) याने आरोपींना २० हजार रुपये आरोपींना हात उसने दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी जमीर खान याने आरोपींकडे तगादा लावला. याच वादातून गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास काद्राबाद प्लॉट परिसरातील कुदरती कॉर्नर येथे आरोपींनी जमीर खान युनूस खान यास रॉडने मारहाण केली. यात जमीर खान याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी वसीम खान अहमद खान यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यावरून आरोपी सय्यद जाफर सय्यद अख्तर, सय्यद जाफर ऊर्फ लड्डया सय्यद इसाक, मुजाहेद हाशमी उर्फ बागी आणि इरफान या चार आरोपींविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जमदाडे तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सय्यद जाफर सय्यद अख्तर आणि मुजाहेद हाश्मी उर्फ बागी या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
 

Web Title: Murder by beating a youth with a rod over a money dispute