सायकलवर कार्यालयात पोहोचले मनपा आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST2021-01-15T04:15:19+5:302021-01-15T04:15:19+5:30
पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये माझी वसुंधरा हे अभियान राबविले जात आहे. येथील महानगरपालिकेतही या अभियानाची सुरुवात ...

सायकलवर कार्यालयात पोहोचले मनपा आयुक्त
पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये माझी वसुंधरा हे अभियान राबविले जात आहे. येथील महानगरपालिकेतही या अभियानाची सुरुवात करण्यात आली. अभियानाचा एक भाग म्हणून आयुक्त देवीदास पवार हे गुरुवारी सकाळी सायकलवरून कार्यालयात उपस्थित झाले. मनपाच्या वतीने माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांचाही या अभियानात सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यापूर्वी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वत: पर्यावरणपूरक कृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिकेत प्रत्येक गुरुवारी नो व्हेइकल डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलचा वापर न करता सायकलवर किंवा पायी चालत येऊन कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.