शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे तर निधीसाठी दिव्यांगांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:20 AM

परळी येथील के. धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने पिकांचा व जागेचा मोबदला न दिल्याने पांगरा, वाई लासीना परिसरातील शेतकºयांनी २ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परळी येथील के. धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने पिकांचा व जागेचा मोबदला न दिल्याने पांगरा, वाई लासीना परिसरातील शेतकºयांनी २ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.पांगरा ढोणे, वाई लासीना व पिंपळा लोखंडे शिवारातील जमिनीतून पॉवर ग्रेड लाईन टाकण्यात आली आहे. यासाठी के.धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने २८ मे २०१८ रोजी शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे केले. लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आरटीजीएसद्वारे पीक नुकसान व जमिनीचा मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन १५ मे २०१८ रोजी व्यवस्थापक, के.धर्माराव यांनी दिले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अद्यापपर्यंत शेतकºयांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे सोमवारपासून शेतकºयांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. विवेकानंद ढोणे, भानुदास ढोणे, हरजी जाधव, मारोती ढोणे, राजेश लोखंडे, यादव ढोणे, मारोती भलाडे, सोपान ढोणे, केशव ढोणे, गजानन ढोणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.मनपा ३ टक्के निधी खर्च करेना...परभणी- महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी राखीव ठेवलेल्या ३ टक्के निधीतून शहरात योजना राबवाव्यात, या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने धरणे आंदोलन सुरु केले आहे.महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. २.२३ कोटी रुपये शहरात अपंग बांधवांसाठी राखीव असताना मनपा योजना राबवित नाही. २०१५ पासून आजपर्यंत अपंगांना या योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. तेव्हा हा निधी खर्च करण्याची तत्काळ परवानगी द्यावी, याच निधीतून अपंगांसाठी पेंशन योजना सुरु करावी, या मागण्यांसाठी परभणी जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने हे आंदोलन सुरु केले आहे. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिकेत सेलगावकर, सचिव शेख मुजाहेद यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागEmployeeकर्मचारी