ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईसह मुलगी ठार; पूर्णा-चुडावा मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:37 IST2025-01-13T19:36:58+5:302025-01-13T19:37:14+5:30

हृदयस्पर्शी घटनेने चुडावा, कलमुलासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Mother and daughter killed in tractor-two-wheeler accident; Incident on Purna-Chudava road | ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईसह मुलगी ठार; पूर्णा-चुडावा मार्गावरील घटना

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईसह मुलगी ठार; पूर्णा-चुडावा मार्गावरील घटना

पूर्णा (जि.परभणी) : चुडावा शिवारात नांदेड- पूर्णा राज्य रोडवरील दुचाकी-ट्रॅक्टरच्या अपघातात आईसह चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना ११ जानेवारी रात्री साडेसात ते साडेआठच्या सुमारास घडली. यात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत.

पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील महिलेला तिचा भाऊ रितेश देसाई दुचाकी क्रमांक (एमएच २२ बीबी ८०४८) ने चुडावावरून नांदेडच्या दिशेने कलमुला येथे बहिणीच्या सासरी दोन मुलीसह नेऊन सोडत असताना ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २६ बीक्यू ३७९९) च्या धडकेत स्वाती बालाजी लेडंगे (वय २५) व त्यांची चार ते पाच वर्षांची मुलगी या दोघींचा मृत्यू झाला. नातेवाईक व पोलिसांच्या मदतीने नांदेड येथे अंदाजे दोन ते तीन वर्षांची एक मुलगी व भाऊ रितेश ज्ञानेश्वर देसाई (१८) याच्या पायाला व हाताला गंभीर इजा झाल्याने नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचारास हलविले.

चिमुकलीवर सुद्धा उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली, तर मयत महिला व तिच्या चिमुकलीवर तिच्या सासरी रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयस्पर्शी घटनेने चुडावा, कलमुलासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Mother and daughter killed in tractor-two-wheeler accident; Incident on Purna-Chudava road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.