पाथरीत तालुक्यात घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:48 IST2018-09-28T15:47:18+5:302018-09-28T15:48:47+5:30
एका महिलेच्या घरात घुसून तिला वाईट हेतूने ओढत तिच्या अंगावरील कपडे फाडल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बोरगव्हान येथे घडली.

पाथरीत तालुक्यात घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल
पाथरी (परभणी ) : एका महिलेच्या घरात घुसून तिला वाईट हेतूने ओढत तिच्या अंगावरील कपडे फाडल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बोरगव्हान येथे घडली. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत महिलेच्या फिर्यादीवरुन दिनकर कुंडलिक कदम याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बोरगव्हाण येथे आज सकाळी दिनकर कुंडलिक कदम हा गावातील एका महिलेच्या घरासमोर उभा राहिला. तिच्याकडे वाईट नजरेने पाहत तिचा हात धरून तिच्या अंगावरील कपडे फाडले.हा प्रकार घडत असताना सदर महिलेने आरडाओरड केली. तेव्हा घरातील सासु व पती यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपी हा झटका मारुन पाळुन गेला. या पूर्वीही शेतात कामाला जाताना रस्त्यावर अडवणे, मोबाईलमध्ये फोटो काढून घेणे, शारीरिक संबधाची मागणी करणे अपहरण करेल असा त्रास व धमक्या कदम देत असे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दिनकर कदम याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब कालापाड करत आहेत.