मनसेकडून मोेटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल दरवाढीचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 15:45 IST2018-05-23T15:45:08+5:302018-05-23T15:45:08+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला.

मनसेकडून मोेटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल दरवाढीचा निषेध
परभणी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. परभणी शहरात पेट्रोल ८५ ते ८६ रुपये लिटर आणि डिझेल ७२ रुपये लिटरप्रमाणे विक्री होत आहे. तर स्वयंपाकाचा गॅसचा भाव ८०० रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. दरवाढीचा फटका इतरही बाबींवर होणार असून, दुचाकीचालक, जीपचालक, ट्रक चालकांच्याही यापुढे आत्महत्या होऊ लागतील, हा धोका शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी २३ मे रोजी मोटारसायकलला फाशी देऊन प्रतिकात्मक पद्धतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील, रुपेश सोनटक्के, सुशिलाताई चव्हाण, अनिल बुचाले, राहुल कनकदंडे, लक्ष्मण रेंगे, बालाजी मुंडे, दिलीप डहाळे, निलेश पुरी, सतीश भनभने, निशांत कमळू, गोविंद ठाकर, नंदाताई सावंत, क्रांती तळेकर, आशा गिराम, रुक्मीण मगर, उत्तम चव्हाण, अर्जून टाक, अमित जिरवणकर, अमोल कुलथे, शुभम टेहरे, आशिष मिसाळ, नवनाथ शिराळे, अमोल मकरंद, अमोल माने, श्याम गवळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.