शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत व्यक्तींना 'मृत' दाखवून शासनाचे लाखो रुपये लाटले; परभणीतील घोटाळ्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:25 IST

पैसे परत करण्याच्या नोटीसमुळे लाभार्थ्यांचा पोलीस ठाण्यात धाव.

पूर्णा (जि. परभणी): तालुक्यातील धानोरा मोत्या गावात एक संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या 'बांधकाम कामगार कल्याणकारी' योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क सात जिवंत व्यक्तींचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. हा प्रकार दोन-तीन वर्षांनी उघडकीस आल्यानंतर आता सरकारी कामगार विभागाने लाभार्थ्यांसह ग्रामसेवकांनाही नोटिसा बजावल्या आहेत, ज्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट मृत्यू प्रमाणपत्रे जोडून लक्ष्मीबाई पांचाळ, कावेरी टाक, सुरेखा डरंगे यांच्यासह एकूण ७ जणांच्या नावे ही आर्थिक मदत लाटण्यात आली.

एजंटांचा जाळ आणि फसवणुकीचा 'ट्रॅप'या घोटाळ्यामागे काही स्थानिक एजंट आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, "आधी आमचे आधार कार्ड आणि फोटो घेतले, काही साहित्यही दिले. त्यानंतर २ लाख रुपये मिळतील, त्यातील ५० हजार तुम्हाला आणि बाकी आम्हाला द्यावे लागतील," असे सांगून हा व्यवहार झाला. मात्र, ज्या कागदपत्रांच्या आधारे हा लाभ मिळाला, त्यात आपल्याला 'मृत' दाखवण्यात आले आहे, हे समजताच लाभार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

पोलीस ठाण्यात धाव अन् अधिकाऱ्यांचा हिसकाजेव्हा कामगार विभागाने घेतलेली रक्कम परत भरण्याच्या नोटिसा बजावल्या, तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. संतप्त पीडितांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नंदकुमार डाखोरे यांच्यासह चुडावा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत केनगे यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाले असून लवकरच दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ग्रामपंचायतीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यातधानोरा मोत्या ग्रामपंचायतीमध्ये या मृत्यूंची कोणतीही नोंद नसल्याचे ग्रामविकास अधिकारी वर्षा गिरे यांनी स्पष्ट केले आहे. तरीही ही बनावट प्रमाणपत्रे कशी तयार झाली आणि त्यावर कोणाच्या स्वाक्षऱ्या आहेत, याचा शोध आता सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड घेत आहेत. "नोटीसच्या उत्तरानंतर पुढची कडक कारवाई केली जाईल," असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani scam: Living declared dead, government defrauded of lakhs.

Web Summary : A shocking Parbhani scam revealed dead people are alive. Falsified death certificates were used to claim government benefits, prompting a police investigation and notices to involved parties.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी