मंगळवारच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:35+5:302021-04-02T04:17:35+5:30
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १ ते ४ एप्रिल या कालावधीत शासकीय कार्यालयांना सुटी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ...

मंगळवारच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत बैठक
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १ ते ४ एप्रिल या कालावधीत शासकीय कार्यालयांना सुटी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दुपारी ३ वाजता त्यांच्या कार्यालयात परभणी शहरातील ९ शाळांवरील केंद्रप्रमुखांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी परीक्षेचा आढावा केंद्रप्रमुखांकडून घेतला. शहरात एकूण ९ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, यावेळी २ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये शारदा विद्यालयाच्या केंद्रावर १८५, सारंगी स्वामी विद्यालयाच्या केंद्रावर २४४, बाल विद्यामंदिर नानलपेठ शाळेवर ५१९, सावित्रीबाई फुले मुलींचे विद्यालय येथे १९६, गांधी विद्यालय कृषी सारथी कॉलनी येथे ३३२, मराठवाडा विद्यालय येथे ५२८, महात्मा फुले विद्यालय येथे १११, जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे ३०२, आनंद माध्यमिक विद्यालय पिंगळी येथे २०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या संकट काळात या परीक्षेदरम्यान प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.