दोन लाखांसाठी विवाहितेला छळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:46 IST2018-01-10T00:46:06+5:302018-01-10T00:46:57+5:30
व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

दोन लाखांसाठी विवाहितेला छळले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
येथील त्रिमूर्तीनगरातील सरस्वती प्रकाश तुरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लग्नानंतर सहा महिने सासरी चांगले नांदविले. त्यानंतर मात्र व्यवसायासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. सरस्वती तुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिंतूर तालुक्यातील दुधनगाव येथील महिलेचा पती प्रकाश तुरे, सासू चबुत्राबाई तुरे, सासरे, भाया शिवाजी तुरे, जाऊ सरस्वती शिवाजी तुरे अशा पाच जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हेड कॉन्स्टेबल पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.