बाजारपेठ आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:46+5:302021-04-05T04:15:46+5:30
परभणी : जिल्ह्यातील बाजारपेठ ५ एप्रिलपासून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी ...

बाजारपेठ आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार
परभणी : जिल्ह्यातील बाजारपेठ ५ एप्रिलपासून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली असून, सायंकाळी ७ नंतर मात्र संचारबंदीचा आदेश कायम राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी संचारबंदी लागू केली होती. १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत जिल्ह्यातील बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मात्र संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. या आदेशाचा कालावधी ५ एप्रिल रोजी संपुष्टात येणार होता. या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवीन आदेश काढला आहे. त्यात ५ एप्रिलपासून सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी ७ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश कायम राहणार आहे. या सुधारित आदेशामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.