Maratha Kranti Morcha : पाथरीत आंदोलकांनी मुंडन करून केला शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:40 IST2018-07-24T17:39:39+5:302018-07-24T17:40:12+5:30
: मराठा मोर्चाच्या आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी 20 आंदोलकांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला.

Maratha Kranti Morcha : पाथरीत आंदोलकांनी मुंडन करून केला शासनाचा निषेध
पाथरी (परभणी) : मराठा मोर्चाच्या आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी 20 आंदोलकांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला.
औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर मराठा क्रांती मोर्च्यानंतर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. याला पाथरीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ पासून शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती, शाळा महाविद्यालय उघडले नाहीत, रस्त्यावर फिरून आंदोलकांनी बंद साठी व्यापाऱ्यांना आवाहन केले.
मुंडन करून केला निषेध
यावेळी २० आंदोलकांनी शासनाचा निषेध करत मुंडन केले. यात शेख समीर या मुस्लिम समाजातील तरुणाने मुंडन करून पाठिंबा दर्शविला. मुंडन आंदोलनात शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर शिंदे यांच्या सह तुकाराम पोळ, भागवत कोल्हे, संदीप टेंगसे, कृष्णा शिंदे, विष्णू काळे, अमोल टाकळकर, सोमेश गरड, अनिल काळे, तुकाराम शिंदे, विशाल घंडगे, गणेश टाकळकर आदींचा सहभाग आहे.