दुबईत अडकले मानवतचे 'सीए' पती-पत्नी; मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:35 IST2026-03-05T15:35:20+5:302026-03-05T15:35:55+5:30

"मदतीच्या बातम्या फक्त टीव्हीवरच, आम्हाला मात्र स्वतःचा खर्च करावा लागतोय!"; दुबईत अडकलेल्या मानवतच्या दाम्पत्याची व्यथा

Manavat Couple Stranded in Dubai Due to Iran-Israel Conflict; No Support from Authorities Despite Claims | दुबईत अडकले मानवतचे 'सीए' पती-पत्नी; मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे साकडे

दुबईत अडकले मानवतचे 'सीए' पती-पत्नी; मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे साकडे

- मोहन बारहाते

मानवत (जि. परभणी) : मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायलदरम्यान उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका मराठवाड्यातील पर्यटकांना बसत आहे. मानवत येथील रहिवासी श्रीरंग चांडक यांचे पुत्र श्रीराम चांडक आणि सून करिष्मा चांडक हे दोघेही सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. त्यांचा परतीचा प्रवास रद्द झाला आहे. विशेष म्हणजे, अडकलेल्या भारतीयांना स्थानिक प्रशासनाकडून मदत मिळत असल्याच्या बातम्या येत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या दाम्पत्याला स्वतःचा खर्च स्वतःच करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीराम चांडक आणि करिष्मा चांडक (दोघांचेही वय ३३) हे दोघेही पेशाने सनदी लेखापाल (सीए) असून, ते पुणे येथे स्थायिक आहेत. कामानिमित्त आणि पर्यटनासाठी हे दाम्पत्य २२ फेब्रुवारीला दुबईला गेले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार ते परतणार होते; परंतु दरम्यानच्या काळात आखाती देशांमधील परिस्थिती बिघडली. क्षेपणास्त्र हल्ले आणि हवाई क्षेत्रातील निर्बंधांमुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून, त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे.

दुबई प्रशासनाचा मदतीचा दावा फोल
दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना तिथले प्रशासन मोफत निवास आणि भोजनाची सोय करून देत असल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांतून दिले जात आहे. मात्र, श्रीराम चांडक यांचे वडील श्रीरंग चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तवात अशी कोणतीही मदत या दाम्पत्याला मिळालेली नाही. दुबईसारख्या महागड्या शहरात त्यांना राहण्याचा आणि खाण्या-पिण्याचा खर्च पदरमोड करून करावा लागत आहे. यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण असून, मायदेशी परतण्यासाठी ते सरकारच्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत.

कुटुंबीयांची चिंता वाढली
दोघेही सुरक्षित असले, तरी युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता भीतिदायक आहे. प्रशासकीय मदतीच्या केवळ बातम्या येत आहेत, प्रत्यक्षात त्यांना तिथे संघर्ष करावा लागत आहे. शासनाने त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
- चांडक कुटुंबीय, मानवत

Web Title : दुबई में फंसे मानवत के दंपति; सरकार से वतन वापसी की गुहार।

Web Summary : मध्य पूर्व तनाव के कारण दुबई में फंसे मानवत के एक दंपति को कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। सहायता की खबरों के बावजूद, वे खुद खर्च वहन कर रहे हैं, और सुरक्षित वापसी के लिए सरकार की सहायता का इंतजार कर रहे हैं। परिवार उनकी कुशलता को लेकर चिंतित है।

Web Title : Manvat couple stranded in Dubai; seek government's help to return.

Web Summary : A couple from Manvat, stranded in Dubai due to Middle East tensions, are facing hardship. Despite reports of aid, they're bearing expenses themselves, awaiting government assistance for their safe return home. The family is worried about their well-being.

टॅग्स :parabhaniपरभणी