शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST2021-04-05T04:16:01+5:302021-04-05T04:16:01+5:30
जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट परभणी : जिल्ह्यात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, ग्रामीण भागात काही गावांमध्ये ...

शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट
परभणी : जिल्ह्यात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, ग्रामीण भागात काही गावांमध्ये आता पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गाव परिसरातील हातपंप, विहिरींची पाणी पातळी कमी झाल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
कालव्यात गाळ;
स्वच्छतागृहांची शहरात दुरवस्था
परभणी : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अनेक स्वच्छतागृह परिसरामध्ये पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे हे स्वच्छतागृह बंद ठेवावे लागत आहेत. मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
वसमत रस्त्याचे काम संथगतीने सुरू
परभणी : वसमत रस्त्यावर असोला पाटी ते झिरो फाटा या दरम्यान रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदरचे काम संथगतीने सुरू असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे अडखळत वाहने चालवावी लागत आहेत.
वाळूअभावी बांधकाम व्यवसाय अडचणीत
परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहे; परंतु वाळू घाटांचे लिलाव रखडले असल्याने खुल्या बाजारात वाळू उपलब्ध होत नाही. त्याचा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. वाळूचे भाव गगनाला भिडल्याने अनेक बांधकामे बंद ठेवण्यात आली आहेत. खुल्या बाजारात वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.
एसटी महामंडळाला लाखोंचा फटका
परभणी : संचारबंदी मुळे जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आल्याने महामंडळाला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. दररोज १७ ते १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या परभणी विभागातील उलाढाल मागच्या सात दिवसांपासून ठप्प आहे.