शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST

परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही ...

परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंतेची असून, आता मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व व्यवहार विस्कळीत झाले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने अजूनही सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थी घरीच बसून आहेत. सकाळी उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी घरी आल्यानंतर जेवण, सायंकाळच्या सुमारास मैदानावर जाऊन खेळणे, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हा नित्यक्रम पार बिघडून गेला आहे. ऑनलाईनच्या निमित्ताने मोबाईल हातात आल्याने दिवसभर मोबाईल, टिव्ही आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत शारीरिक हालचालीच राहिल्या नाहीत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम वजन वाढण्यावर झाला आहे. ही समस्या आता जवळपास अनेक पालकांना सतावत आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या वेळेचे नियोजन करून देत त्यांच्या आहाराकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुलांनी हे करावे...

मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. नियमित सकाळी लवकर उठावे, रात्री लवकर झोपावे. शारीरिक हालचाली करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत मैदानी खेळ खेळावेत. जेवणाच्या वेळा ठरवून त्याच वेळी जेवण करावे. मोबाईल, टिव्ही पाहण्याच्या वेळा निश्चित कराव्यात.

मुलांनी हे करू नये...

मोबाईल, टीव्हीचा अवास्तव वापर टाळावा, बेकरीचे पदार्थ, जंकफूड खाऊ नये, जास्तीत जास्त ७ तासांपर्यंतच झोप घ्यावी. तासन्‌तास एकाच ठिकाणी न बसता शारीरिक हालचाली वाढवाव्यात.

मैदानी खेळ बंद होऊन मोबाईल, टिव्हीचा अति वापर, सतत जंक फूड खाणे, परीक्षा, शाळा नसल्याने कमी झालेला तणाव, मोबाईलवर खेळण्याच्या निमित्ताने वाढलेले बैठक आणि आहारातील अनियमितपणा ही वजन वाढण्याची कारणे आहेत. त्यामुळे मुलांनी फिजिकल ॲक्टीव्हिटीज्‌ वाढविल्या पाहिजेत. केवळ ऑनलाईन अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर करणे आवश्यक आहे.

- डॉ.श्याम जेथलिया, बाल रोग तज्ज्ञ

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्याने वजन वाढत आहे. त्याबरोबर जंकफूडचा अतिवापर होत आहे. विद्यार्थी दिवसभर घरीच असल्याने जंकफूड अधिक प्रमाणात खातात. झोपण्याची, आहाराच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे मुलांचे वजन वाढू शकते. तेव्हा मुलांनी नियमित योगासने केली पाहिजेत. सकस आहार घ्यावा.

डॉ. महेंद्र शर्मा, परभणी.