राजयोगाच्या अग्नीमध्ये विकारांची होळी पेटवा- अर्चना बहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:17 IST2021-03-28T04:17:00+5:302021-03-28T04:17:00+5:30
परभणी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बी. के. सीमा बहन व ...

राजयोगाच्या अग्नीमध्ये विकारांची होळी पेटवा- अर्चना बहन
परभणी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बी. के. सीमा बहन व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सर्व बहनजी उपस्थित होत्या. यावेळी बोलतानां अर्चना बहनजी म्हणाल्या, होळीसाठी बेकायदेशीर वृक्षतोड, गोवऱ्या जाळणे तसेच दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग टाकत वेळ, संपत्ती आणि शक्ती व्यर्थ वाया घालवत इतरांना अपशब्द वापरून त्यातच धन्यता मानली जात आहे. खऱ्या अर्थाने सारे विश्व कोरोना महामारीच्या आजारासोबत युद्ध करीत असताना होळीसारख्या सणाचे अध्यात्मिक रहस्य प्रत्येकाने जानले पाहिजे. प्रजापिता ब्रह्माजींच्या साकार माध्यमाद्वारे राजयोगाचा अभ्यास मानवामध्ये सोळा कलासंपन्न आणि संपूर्ण जीवन निर्विकारी अर्थात पवित्र बनवते. केवळ लाकडांची होळी पेटवून स्व परिवर्तन होणार नाही. त्यासाठी राजयोगाच्या अग्नित आपल्यामधील वाईट-स्वभाव -संस्कार, वाईट चालीरिती, नकारात्मकता, मानसिक ताण-तणाव यांचा अंत केला तर आपले वर्तमान व भविष्य सुख शांतीमय बनू शकेल, असे त्या म्हणाल्या.