५०० रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:13+5:302021-04-24T04:17:13+5:30
परभणी : कीटकनाशके व इतर पदार्थांमधून विषबाधा झालेल्या ५०० रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ...

५०० रुग्णांना जीवदान
परभणी : कीटकनाशके व इतर पदार्थांमधून विषबाधा झालेल्या ५०० रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ४९० रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अपघात विभाग, अस्थीरोग विभाग, जळीत विभाग आदी विभागातून रुग्णांवर उपचार केले जातात. त्याचबरोबर विषबाधा झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात अद्ययावत सुविधांचा वापर करून उपचार केले जातात. २०१९-२० वर्षात ५०० रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात कीटकनाशके व इतर पदार्थांमधून विषबाधा झालेले रुग्ण दाखल झाले होते. त्यातील ४९० रुग्णांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून दाखल झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.