शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपात भाजपच्या ११ सदस्यांचा लेटर बॉम्ब; विशेष सभा उरकली, स्वीकृतची निवड पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:31 IST

५० मिनिटांत उरकली बैठक, भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

- राजन मंगरुळकरपरभणी : महापालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी बी.रघुनाथ सभागृहात झाली. अजेंड्यातील चार विषयांमध्ये प्रभाग समितीच्या रचनेचा विषय मान्य आणि सभागृह नेत्याची निवड पूर्ण झाली. स्वीकृत समिती सदस्यांच्या निवडीचा मुद्दा चर्चा आणि विरोधानंतर अखेर महापौरांनी पुढील बैठकीत घेण्याचे घोषित केले. उद्धवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार आणि शहर विकास आघाडीचे स्थायी समिती सदस्य निश्चित झाले. परंतु, भाजपच्या गटनेत्यांनी दिलेले पत्र आणि नावे उर्वरित ११ सदस्यांनी मान्य नसल्याचे दर्शवित सभागृहात महापौरांकडे स्वतंत्र पत्र दिले. विशेष समितीवरील सदस्यांच्या नावाबाबत देखील भाजपच्या सदस्यांनी पुन्हा नवीन पत्र दिल्याने गटनेते विरुद्ध भाजपचे इतर सदस्य यांच्यातील लेटर बॉम्बमुळे ही सभा गाजली. ५० मिनिटात सभा उरकली.

महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापौर सय्यद इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर नगरसेवक विकास रत्नपारखी हे होते. सभेची सुरुवात वंदे मातरम् आणि राज्य गीताने करण्यात आली. प्रशासनातर्फे महापौर, उपमहापौर यांचा प्रथम सभेत सन्मान करण्यात आला. सभागृह नेता म्हणून उद्धवसेनेचे सय्यद समी उर्फ माजुलाला यांची निवड झाली. सभेच्या विषय सुरू होण्यापूर्वी भाजपच्या दहा सदस्यांनी महापौर यांच्याकडे स्वतंत्र पत्र देऊन स्थायी समितीच्या सदस्यांची तीन नावे त्यात नोंदविली. उद्धवसेना, काँग्रेस, शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नावे गटनेत्यामार्फत प्राप्त झाली होती, ती महापौरांनी सभागृहासमोर सादर केली. स्थायी समितीच्या भाजपच्या तीन सदस्यांच्या नावाबाबत गटनेत्यांचे एक पत्र, तर उर्वरित दहा सदस्यांचे पत्र, अशी स्थिती झाल्याने भाजपची तीन नावे पुढे ढकलण्यात आली. एकूण ७ विशेष समित्यांवरील सदस्यांच्या नावाबाबत उद्धव सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शहर विकास आघाडी यांनी पत्र दिले. ती नावे मान्य झाली. परंतु, भाजपच्या अन्य ११ सदस्यांनी गटनेत्यांनी दिलेल्या यादीतील विषय समितीवरील नावे सुद्धा अमान्य असल्याचे सांगत पुन्हा स्वतंत्र पत्र सादर केले.

आमची नावे जाहीर करा...राष्ट्रवादी अजित पवार, शहर विकास आघाडी सदस्य आणि भाजपच्या गटनेत्या यांनी आम्ही आयुक्तांकडे स्वीकृत सदस्यसाठीचे नामनिर्देशन दिले आहे ती नावे जाहीर करा, अशी मागणी केली, तर उद्धवसेना आणि काँग्रेस यांची नावे आली नसल्याने सर्व सदस्यांची नावे पुढील बैठकीत घेण्यात येतील, असे महापौर सय्यद इकबाल यांनी स्पष्ट केले. या चर्चा आणि विरोधादरम्यान काँग्रेसचे नगरसेवक भगवानराव वाघमारे, राष्ट्रवादीचे विजय जामकर यांनी भूमिका मांडली.

स्वच्छतेवर तोडगा काढा...सभेची सुरुवात होताच राष्ट्रवादीचे सदस्य आकाश लहाने यांनी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर चर्चा करा आणि तोडगा काढा, अशी मागणी केली. नागरिक आमच्या घरापर्यंत येत आहेत, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा असून, त्यावरही बोलण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, ही विशेष सभा असल्याने हे सर्व विषय पुढच्या बैठकीत येतील, असे सभागृहाने स्पष्ट केले. या बैठकीत विरोधी पक्षनेत्याची निवडदेखील झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani BJP infighting delays key municipal committee selections.

Web Summary : Parbhani municipal meeting saw BJP infighting over committee member selections. Disagreement within BJP delayed appointments. Other parties' nominations were approved. Cleanliness issues raised.
टॅग्स :Parbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाparabhaniपरभणीBJPभाजपा