माझे ३०-३५ आमदार होऊ द्या; मराठासह मुस्लिमांनादेखील आरक्षण देतो - महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 17:23 IST2021-12-20T17:10:52+5:302021-12-20T17:23:26+5:30
गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी महादेव जानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

माझे ३०-३५ आमदार होऊ द्या; मराठासह मुस्लिमांनादेखील आरक्षण देतो - महादेव जानकर
छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते, असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी महादेव जानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
महादेव जानकर यावेळी म्हणाले की, सामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो, माझे ३०-३५ आमदार होऊ द्या. ओबीसींची १० मिनिटांत गंमत करून दाखवतो. मराठ्यांना, मुस्लिमांनादेखील आरक्षण देतो, असं महादेव जानकर यांनी म्हटलं. मुस्लिमांनवर तर किती अन्याय आहे, गॅरेज बघितलं कि मुसलमान, अंड्याचे दुकान म्हणलं की मुसलमान, कोंबडीचे दुकान बघितले की मुसलमान, त्यांचा कुठं कलेक्टर नाही, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.
हिंदू भी भिकारी अन मुसलमान भी भिकारी आणि राज्य चालवणारा हा तिसराच मालक असतो. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. मराठा समाजाला मी विनंती करतो, छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं, असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडीभूषण राजा होते. त्यावेळी मराठ्यांना वाटले आम्ही सर्वत्र मिरवतो, आम्हाला नको ते आरक्षण अन् आज काय अवस्था झाली बघा, असं वक्तव्य देखील महादेव जानकर यांनी यावेळी केलं.
परभणी- छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडीभूषण राजा होते, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. pic.twitter.com/61nOe24JTk
— Lokmat (@lokmat) December 20, 2021