पाथरीतील बोरगव्हाण परिसरात बिबट्याची दहशत; तीन जनावरांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:12 IST2023-05-10T13:12:16+5:302023-05-10T13:12:42+5:30
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा.

पाथरीतील बोरगव्हाण परिसरात बिबट्याची दहशत; तीन जनावरांवर हल्ला
पाथरी (परभणी) : पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे बुधवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन जनावरे गंभीर जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी बिबट्या गावात आढळून आला होता त्या नंतर आज पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बोरंगव्हान परिसरामध्ये 10 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला. गाव परिसरात, शेतात बिबट्या सैरावैरा पळत होता. शेतातील ३ जनावरावर या बिबट्याने हल्ला केला. यात आत्माराम इंगळे आणि काशीनाथ इंगळे यांची एक म्हेस आणि एक वासरू याचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आता शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे अधिकारी दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल झाले नव्हते. दोन दिवसांपूर्वी याच भागात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता.
दहा दिवसांपूर्वी एका बिबट्याचा मृत्यू
30 एप्रिल रोजी याच परिसरातील रेनाखळी शिवारातील एका शेतात डुकरापासून संवरक्षणसाठी लावण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता