लिंबाचे झाड तोडले; शेत शेजाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:17+5:302021-04-01T04:18:17+5:30
याबाबत सविस्तर वृत्त असे, सेलू तालुक्यातील डासाळा येथील शिवाजी रामभाऊ पवार यांची डासाळा शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात एक ...

लिंबाचे झाड तोडले; शेत शेजाऱ्यावर गुन्हा दाखल
याबाबत सविस्तर वृत्त असे, सेलू तालुक्यातील डासाळा येथील शिवाजी रामभाऊ पवार यांची डासाळा शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात एक लिंबाचे झाड आहे. त्यांचे शेत शेजारी शेख इद्रीस शेख बडेमिया यांनी त्यांच्या शेतातील लिंबाचे झाड ४ जानेवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता तोडले. ते शेतात गेले असता त्यांना शेख इद्रीस हा झाडाची लाकडे तोडून एका ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याला पवार यांनी जाब विचारला असता त्याने उलट त्यांनाच शिवीगाळ सुरू केली तसेच आपणच मुद्दामहून हे झाड तोडले असल्याचे सांगून मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी सेलू येथील न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. न्यायालयाने २३ मार्च रोजी निकाल देत या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात फौजदारी संहितेनुसार तपास करण्याचे सेलू पोलिसांना आदेश दिले. त्यावरून या प्रकरणी शिवाजी पवार यांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शेख इद्रीस शेख बडेमिया याच्या विरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.