खाटा, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:27+5:302021-04-03T04:14:27+5:30
परभणी :कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खाटा आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशा ...

खाटा, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
परभणी :कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खाटा आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशा सूचना आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिल्या आहेत.
येथील आय.टी.आय. परिसरातील कोविड सेंटर आणि जिल्हा परिषद इमारतीतील लसीकरण केंद्राला आ.डाॅ.राहुल पाटील यांनी २ एप्रिल रोजी भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.प्रकाश डाके आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्य शासन आणि परभणी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कोरोना या महामारीवर मात करु. जिल्हा प्रशासनानेही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच उपाययोजना वाढवाव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील खाटांची संख्या वाढवावी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची सूचनाही आ.पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी आ.डॉ.पाटील यांनी रुग्णांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रशासनाकडून रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.