शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिंतुरात सव्वादोन हजार घरकुलांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

जिंतूर : तालुक्यातील २ हजार २८४ घरकुलांच्या लाभार्थ्यांना शासनाकडून १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला नसल्याने ...

जिंतूर : तालुक्यातील २ हजार २८४ घरकुलांच्या लाभार्थ्यांना शासनाकडून १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला नसल्याने या घरकुलांची कामे अर्धवट आहेत. यामुळे लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिंतूर पंचायत समितीच्या वतीने २०१६-१७, २१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांत ८८१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ८१२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, ६९ घरकुले अर्धवट आहेत. ८८१ पैकी ३७९ घरकुलांच्या लाभार्थ्यांना चौथा हप्ता मिळालेला नाही तर७५ घरकुल लाभार्थ्यांना तिसरा आणि ३९ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळणे बाकी आहे. याच योजनेंतर्गत २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात ४३७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यातील केवळ ६४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल ३७३ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत.

रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७, २०१७-१८ या दोन वर्षांत २ हजार ८९६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २ हजार ३५६ घरकुले पूर्ण झाली आहेत. ५४० घरकुलांचे काम अद्यापही अर्धवट आहे. तर २०१९-२० या वर्षात या योजनेत २४७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यातील एकाही घरकुलाचे काम अद्याप सुरू झाले नाही.

शबरी आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत ४०७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी केवळ ११२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. पारधी आवास योजनेंतर्गत २०१७ ते २०१९ या कालावधीत ९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांची कामे अर्धवट आहेत. अनेक लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाल्यानंतर जुने घर पाडून नवीन घरकूल बांधण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना वेळेवर शासनाचे अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्या घराची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे ते सध्या अडचणीत सापडले आहेत.

१७ कोटी २५ लाखांची आवश्यकता

तालुक्यातील विविध योजनांतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानापोटी १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपये शासनाकडून येणे बाकी आहेत. त्यात ७४२ घरकुलांची पहिल्या हप्त्याची १ कोटी ११ लाख रुपयांची, दुसऱ्या हप्त्याची २ हजार २५२घरकुलांची ५ कोटी ६३ हजार ४० हजार, १ हजार ४८५ घरकुल लाभार्थ्यांची तिसऱ्या हप्त्याची ५ कोटी ९४ हजार आणि २ हजार २८४ घरकुलांच्या चौथ्या हप्त्याची ४ कोटी ५६ लाख ८० हजार अशी एकूण १७ कोटी २५लाख ५० हजार रुपयांची शासनाकडून रक्कम येणे बाकी आहे.