जिंतूर येथे २० गोण्याभरून साडेतीन लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:07 IST2020-03-06T16:05:34+5:302020-03-06T16:07:15+5:30
बंदी घातलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली

जिंतूर येथे २० गोण्याभरून साडेतीन लाखांचा गुटखा पकडला
परभणी : जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एका गोदामावर छापा टाकून ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागातील महावितरणच्या टॉवरजवळ एका गोडाऊनमध्ये राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली़ त्यावरुन या पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास छापा टाकला़ या छाप्यामध्ये जवळपास २० गोण्यांमध्ये ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा आढळला़ तसेच १० हजार रुपयांचे मोबाईलही या ठिकाणावरून या पथकातील कर्मचाऱ्यांनी जप्त केले़ या प्रकरणी आरोपी सचिव कैलासआप्पा लकडे, शेख फय्याज व सदाआप्पा या तिघांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ए़जी़ पांचाळ, फौजदार हनुमान कच्छवे, जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पूजा भोरगे, वानोळे यांच्या पथकाने केली़