टायर फुटल्याने जीपचा भीषण अपघात; दहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:04 IST2021-07-29T17:03:24+5:302021-07-29T17:04:01+5:30
अपघातात जीप चालकाची प्रकृती गंभीर आहे

टायर फुटल्याने जीपचा भीषण अपघात; दहा जण जखमी
पूर्णा : हट्टा येथून नांदेडकडे कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या जीपचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दिनांक 29 जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.
चुडावा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवरून हट्टा येथील खाडे कुटुंबीय हे जीपने नांदेडकडे कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होते. पूर्णा नांदेड मार्गावरील नरहापूर दरम्यान भरधाव वेगात असलेल्या या गाडीचे टायर फुटल्याने वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडीला मोठा अपघात झाला. चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि शिवसांब स्वामी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित, जमादार पंडित पवार, जमादार सूर्यकांत केसकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जीपमधील पुरुष व महिला असे दहा जण जखमी झाले. चालकाची प्रकृती गंभीर असून सर्वांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे.