एक लाख ८० हजार जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST2021-04-05T04:16:12+5:302021-04-05T04:16:12+5:30
दिवसभरात २१५ जणांची चाचणी परभणी : आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी दिवसभरात २१५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा ...

एक लाख ८० हजार जणांची तपासणी
दिवसभरात २१५ जणांची चाचणी
परभणी : आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी दिवसभरात २१५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील ३४, गंगाखेड उपजिल्हा रुग्णलायातील ४५, तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रांतर्गत १०७, पूर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४, सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात ४, सेलू उपजिल्हा रुग्णालयात १०, तर मानवत ग्रामीण रुग्णालयात एक जणाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
१५ आरोग्य केंद्रांकडून अहवालास दिरंगाई
परभणी : कोरोना संशयित रुग्णांची दररोज तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना जिल्ह्यातील १५ आरोग्य संस्थांनी रविवारी प्रशासनाला अहवाल सादर केला नाही. त्यामध्ये परभणी मनपा, आयटीआय काेविड हॉस्पिटल, अस्थिव्यंग रुग्णालय, स्त्री रुग्णालय, परभणी, पालम, सोनपेठ, पाथरी, सेलू, मानवत, जिंतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे.
मूल्यांकनासाठी जालना येथे शिबिर
परभणी : कायम शब्द वगळलेल्या अघोषित तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टिकोणातून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील शाळांसाठी ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जालना येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोरोनामुळे या शिबिरात संबंधित शाळांच्या फक्त दोन प्रतिनिधींनाच उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना मात्र उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रस्त्यावरील खड्ड्याने नागरिक त्रस्त
परभणी : शहरातील महात्मा जोतिबा फुले पुतळा ते सर्वशिक्षा अभियान कार्यालय या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना रहदारीच अडथळा होत आहे.