पावणेदोन लाख नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:34+5:302021-04-03T04:14:34+5:30

जिल्ह्यात केवळ २९९ खाटा रिक्त परभणी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने केवळ २९९ खाटा सध्या रिक्त ...

Investigation of 52 lakh citizens | पावणेदोन लाख नागरिकांची तपासणी

पावणेदोन लाख नागरिकांची तपासणी

जिल्ह्यात केवळ २९९ खाटा रिक्त

परभणी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने केवळ २९९ खाटा सध्या रिक्त आहेत. आरोग्य विभागाने २ हजार ८९१ खाटांची सुविधा उपलब्ध केली असून, त्यापैकी २ हजार ५८१ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. परभणी शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ५५ खाटा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात ११ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १५४ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

७१२ नागरिकांची कोरोना चाचणी

परभणी : शुक्रवारी जिल्ह्यात एकूण ७१२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातही आता चाचण्या होऊ लागल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात जिल्हा रुग्णालय ३२, गंगाखेड तालुक्यात १९२, पूर्णा १९, सोनपेठ ६९, सेलू २९९, मानवत ४४ आणि जिंतूर तालुक्यामध्ये २५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

Web Title: Investigation of 52 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.