तण नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:54+5:302021-03-28T04:16:54+5:30

परभणी : सद्य:स्थितीत तणामुळे उद्‌भवणारे पीक नुकसान व तण नाशकांच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीमध्ये तण व्यवस्थापन, तणनाशकांना ...

Integrated management is the only option for weed control | तण नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन हाच पर्याय

तण नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन हाच पर्याय

परभणी : सद्य:स्थितीत तणामुळे उद्‌भवणारे पीक नुकसान व तण नाशकांच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीमध्ये तण व्यवस्थापन, तणनाशकांना प्रतिकार करणारी तणे आदी बाबींचा विचार केल्यास एकात्मिक तण व्यवस्थापन हाच योग्य पर्याय आहे, असे प्रतिपादन डॉ. सुशीलकुमार यांनी केेले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या सहकार्याने मागासवर्गीय कृषी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी ‘एकात्मिक तण व्यवस्थापन तथा तणनाशकाचा कार्यक्षम वापर’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी जबलपूर येथील भारतीय तण विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशीलकुमार यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी परभणी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सय्यद इस्माईल यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तणनाशकांच्या अयोग्य वापरामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांवर विपरीत परिणाम होऊन जमिनीचे जैविक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. बी.व्ही. आसेवार यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. डॉ. सुनीता पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आय.ए.बी. मिर्झा यांनी आभार मानले. या प्रशिक्षणात कोईम्बतूर येथील तामिळनाडू कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. चिन्ना मुथ्थू, डॉ. मुरली अर्थनारी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. सुनीता, अकोला कृषी विद्यापीठातील तणव्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जे.पी. देशमुख, संशोधन उपसंचालक डॉ. ए.एस. जाधव, डॉ. सुधीर आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. विशाल अवसरमल, डॉ. मेघा जगताप, रविकुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, रामदास शिंपले आदींनी सहकार्य केले.

Web Title: Integrated management is the only option for weed control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.