पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 06:57 PM2020-11-13T18:57:01+5:302020-11-13T18:58:37+5:30

प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले ८० टक्के कर्मचारी उपस्थित होते.

Independent software for graduate election voting percentage | पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर

पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर

Next
ठळक मुद्देपदवीधर निवडणूक मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण 

परभणी : मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे मतदान १ डिसेंबर रोजी होत असून, या प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी  मतदानाच्या टक्केवारी विकसित केलेल्या स्वतंत्र सॉफ्टवेअरचेही प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात १२ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद  विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीअंतर्गत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, औरंगाबाद येथील उपायुक्त रश्मी खांडेकर, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, सुनील पोटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. तेव्हा या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली. मतदान केंद्र तयार करणे, मतदानाच्या दिवशी मतपेटी कशा प्रकारे तयार करायची, मतदान सुरू झाल्याचा अहवाल, संवैधानिक आणि असंवैधानिक लिफाफ्यामध्ये माहिती कशा प्रकारे भरावी, कोणते लिफाफे सील करायचे, प्रत्येक दोन तासांनी मतदानाची टक्केवारी कशी काढायची याविषयी माहिती दिली. मतदानाची टक्केवारी उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर मतदान केंद्राध्यक्षांसाठी तयार करण्यात आले आहे. त्याचेही प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे आदर्श मतदान केंद्र कसे तयार करावे, मतदान पूर्व तयारीचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या प्रशिक्षणाच्या वेळी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते. 

मतपेटीच्या वापराचे प्रशिक्षण
ही निवडणूक ईव्हीएमच्या साह्याने न घेता मतपत्रिकांच्या साह्याने घेतली जाणार आहे. त्यामुळे जम्बो मतपेटीचा वापर कसा करायचा, सिलिंग कार्यपद्धती या विषयीची माहिती यावेळी देण्यात आली.  या प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले ८० टक्के कर्मचारी उपस्थित होते. जे कर्मचारी अनुपस्थित होते, त्यांना नोटीस पाठिवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Web Title: Independent software for graduate election voting percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.