आरोग्य कर्मचाऱ्यांवर वाढला ताण; कर्मचारी वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:19+5:302021-04-01T04:18:19+5:30
जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असले ...

आरोग्य कर्मचाऱ्यांवर वाढला ताण; कर्मचारी वाढविण्याची गरज
जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असले तरी शासकीय रुग्णालयांत उपचार करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे. शिवाय रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी
जिल्ह्यात कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा मुलाखती घेण्यात आल्या असून, त्यात आवश्यकतेच्या तुलनेत निम्मे कर्मचारी घेण्यात आले आहेत. मागील वर्षी साडेतीनशे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर घेतले होते. यावर्षी या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले जात आहे. आरोग्य विभागात स्टाफ नर्सची मोठी कमतरता आहे. त्यामुळे स्टाफ नर्स वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांची गुणवत्ताक्रमानुसार यादीही तयार करण्यात आली आहे. मागणीनुसार कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण वाढला असला तरी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
डॉ. एस. पी. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी.