परभणी जिल्ह्यातील २० रस्त्यांचा दर्जा वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:19 AM2019-01-12T00:19:03+5:302019-01-12T00:19:13+5:30

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे.

Increased the status of 20 roads in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील २० रस्त्यांचा दर्जा वाढविला

परभणी जिल्ह्यातील २० रस्त्यांचा दर्जा वाढविला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकास अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४८.८० कि.मी.लांबीच्या २० रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे यांच्या वतीने ३० आॅक्टोबर २०१८ रोजी पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने या प्रस्तावास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता पूर्णा तालुक्यातील ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा या २.५ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ३८ लाख ४ हजार रुपयांची अंदाजित रक्कम लागणार असून ५ वर्षे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ८ लाख ४ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६२ ते महातपुरी या २ कि.मी.च्या रस्त्यासाठी १ कोटी १९ लाख ६ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या ५ वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख ८४ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. परभणी तालुक्यातील माळसोन्ना ते धसाडी या ३.६४ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी अंदाजित २ कोटी ६७ लाख ९ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ वर्षांकरीता १२ लाख ७४ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. राज्यमार्ग २२२ ते किन्होळा या २.२५ कि.मी.रस्त्यासाठी अंदाजित १ कोटी ५१ लाख ६ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख ८८ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. प्रजिमा ३१ ते ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव या २.८५ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ६४ लाख १ हजार रुपयांचा निधी लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी ९ लाख ९८ हजार रुपये अंदाजित रक्कम लागणार आहे. मानवत तालुक्यातील भोसा ते लोहरा या २ कि.मी. रस्त्यासाठी ९६ लाख ९८ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख रुपये लागणार आहेत. पूर्णा तालुक्यातील ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा या २.१ कि.मी.रस्त्यासाठी १ कोटी ७३ लाख ५ हजार रुपये लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी ७ लाख ३५ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६२ ते महातपुरी या ३.७५ कि.मी.रस्त्यासाठी ३ कोटी १६ लाख ८ हजार रुपयांचा निधी लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी १३ लाख १३ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा या ०.८ कि.मी. रस्त्यासाठी ५१ लाख २८ हजार रुपये लागणार असून दुरुस्तीसाठी २ लाख ८ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. परभणी तालुक्यातील माळसोन्ना ते धसाडी या २.५ कि.मी.रस्त्यासाठी १ कोटी १७ लाख ५ हजार, राज्यमार्ग २२२ ते किन्होळा २ कि.मी.रस्त्यासाठी १ कोटी १२ लाख ६ हजार, प्रजिमा ३१ ते ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव या २.१ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ९ लाख ३ हजार रुपये लागणार आहेत. या तिन्ही रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुक्रमे ७ लाख १८ हजार, ७ लाख व ७ लाख ३५ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. मानवत तालुक्यातील भोसा ते लोहरा या व्हीआर ३१-०३ या २.११ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ४८ लाख २ हजार रुपये लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी २ लाख ८ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. ग्रामीण मार्ग ६५ ते महातपुरी व्हीआर ६१- ६ या १.२ कि.मी.रस्त्यासाठी ९० लाख ४७ हजार रुपये लागणार असून देखभाल दुरुस्तीसाठी ४ लाख २ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. परभणी तालुक्यातील माळसोन्ना ते धसाडी ओडीआर २०-८ या ३ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी २९ लाख ६ हजार रुपये, राज्य मार्ग २२२ ते किन्होळा व्हीआर ४-५० या २.८ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी २० लाख ६ हजार, प्रजिमा ३१ ते ब्रह्मपुरी ते पेडगाव व्हीआर ५.५१ या १.८ कि.मी.रस्त्यासाठी ७७ लाख ४१ हजार रुपये लागणार असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुक्रमे १० लाख ५ हजार, ९ लाख ८ हजार आणि ६ लाख ३ हजार रुपयांची आंदाजित रक्कम लागणार आहे. मानवत तालुक्यातील भोसा ते लोहरा व्हीआर ३१-३ या ३ कि.मी.रस्त्यासाठी २ कोटी २३ लाख ४ हजार, पूर्णा तालुक्यातील ग्रामीण मार्ग ६१ ते बलसा व्हीआर ६२ -२१ या १.९ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ५५ लाख ४ हजार आणि ग्रामीण मार्ग ६२ ते महातपुरी व्हीआर ६१-६ या १.४ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी ११ लाख २ हजार रुपये लागणार आहेत. या तिन्ही रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनुक्रमे १० लाख ५ हजार, ६ लाख ६५ हजार आणि ४ लाख ९ हजार रुपये ५ वर्षांसाठी लागणार आहेत.
अंदाजपत्रकातील माहिती : मराठीतूनच द्यावी लागणार
४या कामासंदर्भातील अंदाजपत्रकातील माहिती मराठीमधून द्यावी व तशा फलकाची तरतूदही संबंधित कंत्राटदाराने करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. रस्त्याच्या कामांना तांत्रिक मान्यता प्रदान करण्यापूर्वी कामाचा वाव, निधी वितरणाचे स्वरुप, हॅड्रोलिक कॅक्यूलेशन आदी बाबींची पडताळणी पूर्ण करुन संकल्प निश्चित करावे. या रस्त्यासाठी लागणारी जमीन संबंधित विभागाच्या ताब्यात आहे, याची खातर करावी, सदरील जमीन खाजगी किंवा वनविभागाची असेल तर नाहरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय काम हाती घेऊ नये, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अद्ययावत दरसूचीनुसार तांत्रिक मंजुरी
या रस्त्याच्या कामांना २०१८-१९ च्या अद्ययावत दरसूचीनुसार तांत्रिक मंजुरी देण्यात यावी, असे आदेश ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तांत्रिक मान्यता प्रदान करणाºया सक्षम अधिकाºयांनी कामांमध्ये प्रस्तावित बाब अन्य कोणत्याही योजनेत/ कार्यक्रमात समाविष्ट नाही तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपलिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी तत्सम यंत्रणांकडे मंजूर नाही, याची खातरजमा करावी, असेही याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Increased the status of 20 roads in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.