मजुरांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:23+5:302021-04-03T04:14:23+5:30

उद्यानांची दुरवस्था परभणी : शहरातील छोट्या उद्यानांची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. गांधी पार्क, शिवाजी पार्क आणि नेहरू ...

Inconvenience to laborers | मजुरांची गैरसोय

मजुरांची गैरसोय

उद्यानांची दुरवस्था

परभणी : शहरातील छोट्या उद्यानांची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. गांधी पार्क, शिवाजी पार्क आणि नेहरू पार्क या तीनही उद्यानांमध्ये विकास कामे झाली नसल्याने उद्यानांना बकाल अवस्था आली आहे.

महागाईचा भडका

परभणी : इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम बाजार भावावर झाला आहे. बाजारपेठेत सर्वच वस्तूंचे भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

कालव्यात गाळ

परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात गाळ साचल्याने कालव्याची वहन क्षमता कमी झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून सोडण्यात आलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

एटीएममध्ये खडखडाट

परभणी : शहरातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट निर्माण झाला आहे. संचारबंदी आणि ३१ मार्चमुळे बँकांचे व्यवहार बंद असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.

Web Title: Inconvenience to laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.