समाजाची गरज ओळखून केलेले कार्य महत्त्वपूर्ण : ढवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:08+5:302021-04-03T04:14:08+5:30

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यलयात कृषी महाविद्यालयाच्यावतीने ३१ मार्चरोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी ...

Important work done by recognizing the need of the society: Dhawan | समाजाची गरज ओळखून केलेले कार्य महत्त्वपूर्ण : ढवण

समाजाची गरज ओळखून केलेले कार्य महत्त्वपूर्ण : ढवण

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यलयात कृषी महाविद्यालयाच्यावतीने ३१ मार्चरोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. ढवण बोलत होते.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. उदय देशमुख, कुणाल चव्हाण, मोतीराम चव्हाण आदींची उपस्थिती होती. आज थॅलेसेमिया व इतर रुग्णांना रक्ताची मोठी गरज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव परिस्थितीत रक्तदान करताना मर्यादा येत आहेत. समाजाची गरज ओळखून योग्यवेळी रक्तदान करून कृषी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे कुलगुरू ढवण म्हणाले. यावेळी डाॅ. उदय देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. रासयो कार्यक्रमाधिकारी डॉ. अनुराधा लाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनंत बडगुजर यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील २५ पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. विनोद शिंदे, डॉ. सुहास देशमुख, डाॅ. आशाताई देशमुख, डॉ. डी. एफ. राठोड आदींनी प्रयत्न केले,

Web Title: Important work done by recognizing the need of the society: Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.