परभणी हद्दीतून वाळूचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:36+5:302021-05-08T04:17:36+5:30
परभणी तालुक्यातील संबर, सावंगी येथील पूर्णा नदीच्या पत्रातून मागील काही दिवसापासून वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. संबर- ...

परभणी हद्दीतून वाळूचा अवैध उपसा
परभणी तालुक्यातील संबर, सावंगी येथील पूर्णा नदीच्या पत्रातून मागील काही दिवसापासून वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. संबर- सावंगी- साडेगाव यामार्गे वाळूची दररोज अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनधारकांना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आता वसमत तालुक्यातील काही वाळू माफिया सावंगी, संबर येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा त्रास होत आहे. याबाबत अनेक ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र छोट्या- मोठ्या कारवाया करून महसूल प्रशासन नाम निराळ्या होत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी सांवगी सह आदी गावातील ग्रामस्थांतून होत आहे.