ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रिफ्लेक्टरकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST2021-01-15T04:15:24+5:302021-01-15T04:15:24+5:30
गंगाखेड तालुक्यातून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर, बैलगाडी, ट्रक यांची संख्या अधिक आहे. वाहन नियमानुसार ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला ...

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रिफ्लेक्टरकडे दुर्लक्ष
गंगाखेड तालुक्यातून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर, बैलगाडी, ट्रक यांची संख्या अधिक आहे. वाहन नियमानुसार ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला रेडियमचे रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे. वाहनातील उसाच्या मागील बाजूस रिफ्लेक्टिव्ह क्राॅसचिन्ह, लाल रंगाचा चमकणारा कपडा अडकविणे नियमात आहे. अशा नियमांचे सर्रास उल्लंघन ऊस वाहतूक वाहनधारक करताना दिसून येतात. वाहनात म्युझिक सिस्टीमचा वापर होतो. हा वापर नियमबाह्य आहे. शेतातून मुख्य रस्त्यावर वाहन आणताना पुरेशी काळजी चालक घेत नाहीत. मागील बाजूचे वाहन दिसावे, यासाठी वाहनाला आरसा लावणे आवश्यक असताना ते लावण्यात येत नाहीत. क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जातो. अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.