शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओचे कट्टे, घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:38+5:302021-09-16T04:23:38+5:30

परभणी : शहरातील अनेक ठिकाणी रोडरोमिओंकडून युवतींची छेड काढली जात असल्याने शाळा, महाविद्यालय, तसेच अन्य कामासाठी घराबाहेर पडलेली मुलगी, ...

How safe is Rodrओguez, the girl who fell out of the house? | शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओचे कट्टे, घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?

शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओचे कट्टे, घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?

परभणी : शहरातील अनेक ठिकाणी रोडरोमिओंकडून युवतींची छेड काढली जात असल्याने शाळा, महाविद्यालय, तसेच अन्य कामासाठी घराबाहेर पडलेली मुलगी, युवती सायंकाळी घरी परतेपर्यंत पालकांना चिंता लागून राहते. याबाबत पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

परभणी शहराचा विस्तार वाढला आहे. यात शाळा, महाविद्यालय परिसर, तसेच गल्लीबोळांतील खासगी शिकवणी, मैदाने, बाजारपेठेतील काही ठिकाणे व मुख्य महामार्ग परिसर, उद्याने या ठिकाणी टवाळखोर युवकांकडून युवतींची छेड काढली जाते. अशा टवाळखोर युवकांच्या त्रासामुळे घराबाहेर विविध कामांसाठी पडलेली मुलगी घरी परतेपर्यंत पालकांना चिंता लागून राहते. पोलीस पथकाकडून अशा टवाळखोरांविरुद्ध कारवाईसुद्धा केली जाते. मात्र, तरीही अनेक ठिकाणी हे टवाळखोर पुन्हा थांबून छेडछाड करण्याचे प्रकार करतातच. या टवाळखोरांना वेळीच चोप देणे गरजेचे आहे.

छेड काढणाऱ्या ४२ जणांच्या मुसक्या आवळल्या

परभणी शहरात दामिनी पथक कार्यरत आहे. या पथकाला छेडछाड विरोधी पथक म्हटले जाते. महिला पोलीस अंमलदार व चालक, तसेच महिला अधिकाऱ्यांसह शहरात विविध ठिकाणी पथकामार्फत गस्त घातली जाते. या पथकाकडून मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ४२ कारवाया करण्यात आल्या. या सहा-सात महिन्यांत अनेक ठिकाणी गस्त घातली जात आहे. मात्र, कारवाई झाली नाही.

दामिनी पथक काय करते?

घराबाहेर पडलेल्या मुली, युवती व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक कार्यरत असते. जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवतीची छेड काढल्याचा प्रकार घडल्यास सदरील माहिती दामिनी पथकाच्या हेल्पलाइन क्रमांकावर दिल्यानंतर या पथकाकडून तेथे पोलीस स्टेशनचे अथवा दामिनी पथकाचे कर्मचारी पोहोचतात. यानंतर संबंधिताला समज देणे किंवा महिलेची तक्रार करण्याची इच्छा असेल, तर गुन्हा नोंद करून घेतला जातो.

कोणी छेड काढत असेल, तर येथे संपर्क करा.

परभणी शहरासह जिल्ह्यातील दामिनी पथकाकडून हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. यात ७७४५८५६६६६ या क्रमांकावर फोन करून छेड काढणाऱ्याविरुद्ध माहिती देता येते. त्यानंतर पथक त्यावर कारवाई करते.

या ठिकाणचे रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का?

मुख्य बाजारपेठ

शहरातील शिवाजी चौक ते स्टेशन रोड व अन्य भागात दिवसा, तसेच रात्रीच्या वेळी छेडछाडीचे प्रकार घडतात. काही वेळेला टवाळखोर मुले युवतींच्या वाहनामागे वाहन नेणे, तसेच अपशब्द वापरणे, असे प्रकार करतात.

वसमत राष्ट्रीय महामार्ग

शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर शाळा, महाविद्यालय यासह नेट कॅफे, कॉफी शॉप व हॉटेल्स, अशी अनेक ठिकाणे आहेत. या ठिकाणी युवक- युवती मित्र-मैत्रिणींसोबत सायंकाळच्या वेळी एकत्र जमतात. अशा ठिकाणी काही टवाळखोरांकडून छेडछाड केली जाते.

संभाजीनगर, दादाराव प्लाँट परिसर

प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या न्यायालय परिसरातून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी काही मुले सायंकाळी, तसेच रात्री उशिरापर्यंत थांबतात. दारू पिऊन गोंधळ घालणे, तसेच मुलींना छेडणे, असे प्रकार या भागात अनेकदा घडले आहेत.

या वसाहतीत पाहणी आवश्यक

शहरातील देशमुख हाॅटेल, जिंतूर रोड, विद्या नगर, सरकारी दवाखाना रुग्णालय, लोकमान्य नगर रस्ता, कल्याण मंडपम, शासकीय अधिकारी निवासस्थाने, कौटुंबिक न्यायालयाशेजारील रस्ता, शिवराम नगर, कृषी विद्यापीठ रस्ता.

Web Title: How safe is Rodrओguez, the girl who fell out of the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.