परभणीत क्रीडा संकुल परिसरातील वसतिगृहाच्या गोदामास आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 19:09 IST2018-01-02T19:09:03+5:302018-01-02T19:09:26+5:30

शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या क्रीडा विभागाच्या वसतिगृहास सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या ठिकाणी खेळाडू वास्तव्यास नसल्याने पुढचा अनर्थ टळला.

Hostel godown fire in Parbhaniit sports complex area | परभणीत क्रीडा संकुल परिसरातील वसतिगृहाच्या गोदामास आग

परभणीत क्रीडा संकुल परिसरातील वसतिगृहाच्या गोदामास आग

परभणी : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या क्रीडा विभागाच्या वसतिगृहास सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या ठिकाणी खेळाडू वास्तव्यास नसल्याने पुढचा अनर्थ टळला.

जिल्हा स्टेडियम परिसरात नवीन बॅडमिंटन हॉलच्या शेजारी विद्यार्थ्याना थांबण्यासाठी नव्याने वसतिगृह बांधले आहे. या वसतिगृहातील एका गोदामात गाद्या आणि इतर साहित्य ठेवले होते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या साहित्यास आग लागली. वसतिगृहाच्या खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याने येथील नागरिकांनी अग्नीशमन दलात घटनेची माहिती दिली. अवघ्या दहा मिनिटात अग्नीशमन दल या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: Hostel godown fire in Parbhaniit sports complex area