- राजन मंगरूळकर परभणी : मागील दोन वर्षात शहरातील विविध भागातून गहाळ झालेले मोबाईल सापडतील याची अनेकांनी आशा सोडली होती. मात्र या मोबाईल धारकांना जिल्हा पोलीस दलाने सुखद धक्का दिला. २६ जानेवारी रोजी जवळपास २५० मोबाईल हे संबंधितांना बोलावून खात्री करून परत करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरातील नवा मोंढा, नानलपेठ, कोतवाली ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलची तक्रार नोंदविलेल्या मागील दोन वर्षातील मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल सापडून परत देण्यात आले. हा कार्यक्रम सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला. याप्रसंगी ४० लाखापेक्षा अधिक किमतीचे २५० वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हे मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कदम, महादेव मांजरमकर, विश्वजीत कासले यांच्यासह सायबर चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Web Summary : Parbhani police returned 250 lost mobiles, worth over 4 million, to their owners on January 26th. The phones were recovered from areas under Nawa Mondha, Nanalpeth, and Kotwali police station jurisdictions, bringing relief to those who had filed complaints over the last two years.
Web Summary : परभणी पुलिस ने 26 जनवरी को 40 लाख से अधिक के 250 गुम हुए मोबाइल उनके मालिकों को लौटा दिए। ये फोन नवा मोंढा, नानलपेठ और कोतवाली पुलिस स्टेशन के अधिकार क्षेत्र से बरामद किए गए, जिससे पिछले दो वर्षों में शिकायत दर्ज कराने वालों को राहत मिली।