वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:47+5:302021-04-06T04:16:47+5:30
रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची मागणी देवगाव फाटा : कोरोनामुळे सर्वत्र रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. अपघात, शस्त्रक्रिया आदींच्या रुग्णांना रक्त ...

वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले
रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची मागणी
देवगाव फाटा : कोरोनामुळे सर्वत्र रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. अपघात, शस्त्रक्रिया आदींच्या रुग्णांना रक्त मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यापूर्वी नागरिकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. यासाठी विविध सामाजिक, संघटना, पक्षांनी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
सेलूत फळांची आवक वाढली
देवगाव फाटा : शहरात गेल्या काही दिवसापासून फळांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. चिकू, सफरचंद, अननस, संत्री, मोसंबी, नारळ आदी फळे शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला विकताना विक्रेते दिसून येत आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती
सोनपेठ : सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती चांगलीच वाढली आहे. त्यामुळे गावात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना शासनाच्या आदेशानुसार फाटा देण्यात आला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसून येत आहे.
उन्हाचा पारा वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त
सोनपेठ : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. शिवाय उकाडा वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला रसवंतीगृह दुकाने थाटू लागली आहेत.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
सोनपेठ : राज्य शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली असली तरी सोनपेठ शहर व तालुक्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किरकोळ विक्रेतेही प्लास्टिक सर्रासपणे बाळगत आहेत. या अनुषंगाने संबंधितांवर कारवाई होत नसल्याने या प्रकारास आळा बसत नाही.