- प्रमोद साळवेगंगाखेड (परभणी): दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाचा संसार उध्वस्त केला, तर १६ वर्षांच्या मुलाच्या हातून गंभीर गुन्हा घडला. तालुक्यातील इसाद येथे मंगळवारी (दि. ४) रात्री उशिरा आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांचा, त्यांच्याच मुलाने पोटात चाकू खुपसून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आईला सातत्याने होणाऱ्या त्रासाने संतप्त झालेल्या या अल्पवयीन मुलाच्या कृत्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
आईचा छळ पाहून संताप अनावरइसाद येथील रहिवासी गणेश अंकुशराव भोसले (वय ४०) यांना दारूचे व्यसन होते. नशेत ते दररोज पत्नीस (मुलाच्या आईला) मारहाण करत असत. वडिलांकडून आईचा सातत्याने होणारा छळ पाहून त्यांचा १६ वर्षीय मुलगा आतून संतप्त होता. दरम्यान, मंगळवारी रात्री १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास गणेश भोसले यांनी पुन्हा पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आईला रोजच होणारा हा त्रास पाहून मुलाचा संताप अनावर झाला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता घरातील चाकू घेतला आणि वडिलांच्या पोटात वार केले. गंभीर जखमी झाल्याने गणेश भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून तातडीने तपास सुरूबुधवारी (दि. ५) सकाळी घटनेची माहिती मिळताच गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. वडिलांकडून सातत्याने आईचा छळ पाहून कंटाळून मुलाने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, मुलावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
Web Summary : In Isad, a 16-year-old boy fatally stabbed his alcoholic father after witnessing his constant abuse of his mother. The tragic incident has sparked widespread sorrow. Police are investigating, and legal proceedings against the boy are underway.
Web Summary : इसाद में, 16 वर्षीय लड़के ने अपनी माँ के साथ लगातार दुर्व्यवहार करने वाले शराबी पिता को मार डाला। इस दुखद घटना से व्यापक दुख है। पुलिस जांच कर रही है, और लड़के के खिलाफ कानूनी कार्यवाही चल रही है।