चालत्या बसमध्ये मुख्याध्यापकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:19 IST2018-03-24T00:19:52+5:302018-03-24T00:19:52+5:30
चालत्या बसमध्ये ºहदयविकाराचा झटका आल्याने पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा २३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली.

चालत्या बसमध्ये मुख्याध्यापकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): चालत्या बसमध्ये ºहदयविकाराचा झटका आल्याने पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा २३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली.
पेठ पिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नारायणराव नरवटे (वय ५१, रा. कोळनूर, ता. जळकोट) हे २३ मार्च रोजी परभणी येथे जाण्यासाठी पालम येथे आले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास पालम ते गंगाखेड दरम्यान, बसमध्ये प्रवास करीत असताना मुख्याध्यापक नरवटे यांना ºहदयविकाराचा झटका आला. ही घटना इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी याची माहिती बस वाहकाला दिली. वाहकाने तातडीने १०८ क्रमांकावर रुग्णवााहिकेला फोन केला व बस पालम रोडवरील दत्त मंदिर चौकामध्ये आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे, माला घोबाळे, हटकर, सदाशिव लटपटे यांनी तपासले असता शिवाजी नरवटे यांना मृत घोषित केले. शिवाजी नरवटे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.