धावत्या बसमधून उडी घेतल्याने गतिमंद मुलीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:37 IST2019-06-28T15:36:00+5:302019-06-28T15:37:35+5:30

रत्नापुर शिवारात टोलनाक्याजवळ मृतदेह आढळून आला. 

Gymnastic girl's death due to jump from a moving bus | धावत्या बसमधून उडी घेतल्याने गतिमंद मुलीचा मृत्यू 

धावत्या बसमधून उडी घेतल्याने गतिमंद मुलीचा मृत्यू 

मानवत (परभणी ) : धावत्या लक्झरी बसमधून उडी घेतल्याने एका १९ वर्षीय गतीमंद मुलीचा मृत्यू झालाची घटना शुक्रवारी (दि.२८) पहाटे पाच वाजच्या दरम्यान घडली. मुक्ता अंबादास हरकाळ असे मृत मुलीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील झरी येथील रहिवासी अंबादास हरकाळ हे आठवडा भरापूर्वी आपली मुलगी मुक्ता हिला सोबत घेऊन दिंडीत आळंदी येथे गेले होते. दिंडीत पुढे जायचे असल्याने अंबादास यांनी गतिमंद असलेल्या मुक्ता हिला गावातीलच लक्ष्मीबाई भुसारे यांच्यासोबत गुरुवारी (दि.२७) रात्री लक्झरी बसमधून गावाकडे रवाना केले. आज पहाटे साडेपाच वाजता बस मानवत येथे पोहचली असता लक्ष्मीबाई यांना जाग आली. यावेळी मुक्ता त्यांच्यासोबत नव्हती. मुक्ता बसमध्ये नसल्याचे त्यांनी चालकास सांगितले. यानंतर मुक्ताचा शोध घेण्यासाठी बस पाथरीच्या दिशेने निघाली. याचवेळी रत्नापुर शिवारात टोलनाक्याजवळ मुक्ताचा मृतदेह आढळून आला. 

धावत्या बसमधून उडी घेतल्याने मुक्ताचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोउनि शिवाशंकर मन्नाळे, पोलीस कर्मचारी निलेश परसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  अधिक तपास बीट जमादार अशोक ताठे करत आहेत. 

Web Title: Gymnastic girl's death due to jump from a moving bus