रोहयोच्या कामांची वाढेना संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:23 AM2021-02-26T04:23:16+5:302021-02-26T04:23:16+5:30

नागरी सुविधांचा वसाहतींत अभाव परभणी : शहरात नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. रस्ते, नाल्या, पाणी ...

The growing number of Rohyo works | रोहयोच्या कामांची वाढेना संख्या

रोहयोच्या कामांची वाढेना संख्या

Next

नागरी सुविधांचा वसाहतींत अभाव

परभणी : शहरात नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. रस्ते, नाल्या, पाणी या मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यात या वसाहतीतील नागरिकांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता, मनपाने नव्या वसाहतींत कामे हाती घ्यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहराच्या सीमेवरही सुरू झाल्या तपासण्या

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मनपाने शहराच्या सीमेवर पथके तैनात केली आहेत. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची थर्मल स्कॅनिंग या ठिकाणी केली जात आहे. सकाळी ९ वाजेपासूनच मनपाचे कर्मचारी रस्त्यावर उतरुन बाहेरुन शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची तपासणी करीत आहेत. संशयित वाटणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेतली जात आहे.

कोरोना लसीकरणाला वाढला प्रतिसाद

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाला आता चांगलाच प्रतिसाद वाढला आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना सुरुवातीला ही लस दिली जात आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेले लसीकरण अद्याप संपलेले नाही. सद्यस्थितीला ६१ टक्के लसीकरण झाले असून, दोन दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसू लागली आहे.

खड्ड्यांमुळे वाढला धुळीचा त्रास

परभणी : शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. जागोजागी मनपाकडून खोदकाम केले जात आहे. त्यात निघालेली माती वातावरणात मिसळत असून धुळीचा त्रास वाढला आहे. शहरातील अनेक भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, त्यासाठी हे खोदकाम केले जात आहे. धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पीक कर्जाचा प्रश्न आडगळीत

परभणी : रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचा प्रश्न आता आडगळीत पडला आहे. हा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, येत्या काही दिवसांत पिकांची काढणी सुरू होणार आहे. मात्र अजूनही बँक प्रशासनाने पीक कर्ज वाटपाची गती वाढविली नाही. त्यामुळे खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आता मावळली आहे.

जिल्हा स्टेडियम परिसरात मनपाकडून स्वच्छता

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात मनपाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी स्वच्छतेची कामे केली. या भागातील कचरा जमा करुन घंटागाडीतून उचलून नेण्यात आला. अनेक दिवसानंतर या परिसरात ही मोहीम राबविण्यात आली.

Web Title: The growing number of Rohyo works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.